सोयाबीन तेल आयात करण्यावर केंद्र शासनाने निर्बंध घातले आहे. आयात तेलावर कर वाढविल्यामुळे तेलाच्या दरात सुधारणा झाली असून याचा परिणाम सोयाबीनच्या किमतीवर ही झाला आहे. आठ दिवसापूर्वी चार हजार रूपये रुपये क्विंटल पर्यंत असलेला सोयाबीन 4700 क्विंटल पर्यंत सुधारणा झाली आहे.केंद्र शासनाच्या आयात धोरणामध्ये बदल केल्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळत असून या दरात आणखी वाढ झाल्यास शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.