Tuesday, February 18, 2025

अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना

अहमदनगर-गणपती विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी तलावात बुडून मृत्यू – झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगर -जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. गणपती विसर्जना दरम्यान 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव इथं ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरुन तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृत युवकांची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles