Thursday, March 20, 2025

नगरमध्ये उड्डाण पुलावरून ट्रक चांदणी चौकात कोसळला, १ जण ठार १ जण गंभीर जखमी

नगर शहरातील उड्डाणपुलावर बुधवारी (दि.२४) दुपारी भीषण अपघात झाला. उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जात असलेला आयशर कंपनीचा मालट्रक उड्डाणपुलावरील कठडे तोडून खाली कोसळला आहे. चांदणी चौक परिसरात हा अपघात झाला असून यात ट्रक मधील १ जण जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे.

सदरचा मालट्रक हा छत्रपती संभाजी नगर येथील असून मृत व जखमी दोघेही तेथीलच आहेत. छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या या मालट्रक मध्ये (क्र.एमएच २० जीसी ६४५०) पीव्हीसी पाईप व त्याचे साहित्य होते. बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास नगरच्या उड्डाणपुलावरून हा मालट्रक जात होता.

उड्डाणपुलावरील वळणावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाणपुलावरील संरक्षण कठडे तोडत खाली रस्त्यावर पडला. यात १ जण जागीच ठार तर १ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles