Tuesday, May 28, 2024

नगर व शिर्डी मतदारसंघात मतदान केंद्रावर वेबकास्टीं ग कॅमे-याद्वारे करडी नजर, जिल्हााधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान
मतदान केंद्रावर वेबकास्टीं ग कॅमे-याद्वारे करडी नजर
जिल्हां निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. 12 मे – 37 अहमदनगर व 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघांसाठी 13 मे, 2024 रोजी मतदान होणार असुन या मतदान केंद्रावर वेबकास्टीं ग कॅमे-याद्वारे प्रशासनामार्फत करडी नजर ठेवण्यात येणार असल्यामची माहिती जिल्हााधिकारी तथा जिल्हाे निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने एकूण मतदान केंद्रांच्या 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्याच्याए सूचना दिल्या आहेत. अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्याय मतदानासाठी 3 हजार 734 मतदान केंद्र राहणार आहेत. त्यापैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 26 व शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1 हजार 708 मतदान केंद्र आहेत. यापैकी अहमदनगर मतदारसंघातील 1 हजार 018 मतदान केंद्रांवर तर शिर्डी मतदार संघातील एकूण 856 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच शाळेत किंवा इमारतीत असणा-या अहमदनगर मतदारसंघातील 172 मतदान केंद्रांवर व शिर्डी मतदार संघातील 134 मतदान केंद्रांवरही वेबकॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय निवडणूक निरीक्षक यांच्या सूचनेनुसार अहमदनगर मतदारसंघातील 164 मतदान केंद्रांवर वेब कॅमेरा द्वारे नजर ठेवली जाणार आहे.
मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व गोपनीयतेचा भंग न होता मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे हे याद्वारे सुनिश्चित केले जाते. तसेच मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करणे व घडल्यास संबंधिताविरुद्ध योग्य कारवाई करण्यासाठी देखील याचा वापर करण्याबत येणार असल्या.चेही श्री सालीमठ यांनी कळविले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles