Monday, April 22, 2024

नगर शहरात डॉक्टरचे एटीएम चोरून जवळपास पावणे दोन लाखाला घातला गंडा, गून्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – डॉक्टरचे एटीएम कार्ड चोरून त्याव्दारे बँक खात्यातून १ लाख ६० हजार रूपयांची रक्कम काढून घेतल्याची घटना घडली. याप्रकरणी डॉ. सुधाकर रामचंद्र तिटकारे (वय ६६, रा. समतानगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. तिटकारे राहत असलेल्या बंगल्यातच त्यांनी ओपीडी सुरू केली आहे. ओपीडीची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ व दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशी आहे. त्यांचे डोंबीवली नागरी सहकारी बँक, लालटाकी येथे खाते असून त्या बँकेच्या एटीएम कार्डचा ते वापर करत असतात. ११ फेब्रवारी रोजी डॉ. तिटकारे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या ओपीडीत असताना त्यांच्याकडे रूग्णांची ये-जा सुरू होती. त्याच दरम्यान त्यांनी पर्समधील एटीएम काढून सोप्यावर ठेवले तेथून अज्ञात व्यक्तीने एटीएम चोरून नेले.

दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी डॉ. तिटकारे यांना मोबाईलवर ६० हजार, ५० हजार व ५० हजार काढले असल्याचे तीन मेसेज आले. त्यांनी बँकेत जाऊन खात्री केली असता त्यांच्या एटीएमवरून एकुण १ लाख ६० हजार रूपये काढल्याची माहिती मिळाली.

दरम्यान डॉ. तिटकारे यांनी घरात एटीएमचा शोध घेतला असता ते मिळाले नाही. त्यामुळे त्यांना खात्री झाली की, अज्ञात व्यक्तीने एटीएम चोरून त्याचा वापर करून खात्यातून १ लाख ६० हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
5

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles