Saturday, January 18, 2025

अहमदनगर शहरात धक्कादायक घटना : पोलीस अधिकार्‍याने महिलेवर केला अत्याचार

अहमदनगर- तारकपूर बस स्थानकाशेजारील रामवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. ५) पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यामध्ये एक वकील, एक पोलीस अधिकार्‍याचा समावेश आहे. आफ्रोज शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जिल्हा रूग्णालय), कुलकर्णी वकील (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), पोलीस अधिकारी विकास वाघ, आरती वाघ (दोघांची पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) व आफ्रोजचा मामा (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी समाजसेवेच्या कामाकरीता तारकपूर बस स्थानकाशेजारून रामवाडीकडे जाणार्‍या रस्त्याने जात असताना आफ्रोज शेख व आरती वाघ यांनी फिर्यादीचे पाय धरले व कुलकर्णी वकील, पोलीस अधिकारी विकास वाघ, आफ्रोजचा मामा यांनी फिर्यादीचे कपडे फाडून त्यांच्यावर इच्छेविरूध्द जबरदस्तीने अत्याचार केला.

फिर्यादीने आरडाओरडा करून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आफ्रोज शेख व आरती वाघ यांनी त्यांना पुन्हा पकडून शिवीगाळ, मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक पी. ए. श्रीवास्तव करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles