Tuesday, June 25, 2024

नगर शहरात दोन गटातील वादावरुन एकमेकांवर कोयत्याने हल्ला 7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर शहरात दोन गटातील वादावरुन एकमेकांवर कोयत्याने हल्ला करणारे 07 आरोपी व 1 विधीसंघर्षीत बालक गुन्हे शाखेकडुन ताब्यात

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी नामे चेतन संतोष सरोदे वय 18 वर्षे, रा. भिम चौक, गांधीनगर, बोल्हेगांव, ता. जि. अहमदनगर हा लोकसभा निवडणुकीचे वेळी मतदान केंद्राजवळील भारतीय जनता पार्टीचे बुथजवळ थांबलेला असल्याचे कारणावरुन दिनांक 18/05/2024 रोजी रात्री 10.30 वा. चे सुमारास आरोपी नामे 1) आदेश किसन भिंगारदिवे, 2) संकेत किसन भिंगारदिवे, 3) जमीर पठाण, 4) सोन्या लांडगे, 5) रोहित जाधव, 6) पंकज दराडे व त्यांचेसोबत असलेले इतर अनोळखी 4 ते 5 साथीदारांनी लाकडी दांडके, कोयत्याने फिर्यादी व त्याचे सोबत असलेल्या मित्रांना मारहाण केली आहे. सदर घटनेबाबत तोफखाना पो. ठाणे गु.र.नं. 619/2024 भादवि कलम 307, 143, 147, 148 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच फिर्यादी आदेश किसन भिंगारदिवेवय 20 वर्षे, रा. गांधी नगर, भिंगारदिवे मळा, ता. जि. अहमदनगर यास पंकज मच्छिंद्र दराडे याला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने तो त्याचे मित्रासह गावडे किराणा दुकानासमोर जावुन आरोपी नामे 1) आशिष विठ्ठल शिरसाठ, चेतन संतोष सरोदे, 3) योगेश संतोष सरोदे, 4) शारुन दाऊद जाधव, 5) यश रावसाहेब शिरसाठ यांना तुम्ही मारहाण का केली याबाबत विचारणा केला असता त्यांनी फिर्यादी व त्याचे मित्रांना लाकडी दांडके, कोयत्याने मारहाण केली आहे. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 618/2024 भादवि कलम 324, 323, 504, 143, 147, 148 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर घटना गंभीर स्वरुपाची असल्याने व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात यांना आदेश दिलेले होते.
नमुद आदेशान्वये सपोनि हेमंत थोरात, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विशाल दळवी, सचिन अडबल, संतोष खैरे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, बाळासाहेब गुंजाळ, रविंद्र घुंगासे, उमाकांत गावडे, अरुण मोरे असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन स्वतंत्र पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणेबाबत सुचना देवुन पथक रवाना केले होते.
वरील दोन्ही पथकांनी जिल्हा रुग्णालय अहमदनगर, मॅककेअर हॉस्पीटल अहमदनगर येथे ऍ़डमिट असलेल्या फिर्यादींना भेटुन, गुन्ह्याची संपुर्ण माहिती घेण्यात आली. त्यानंतर गुप्त बातमीदारामार्फत अनोळखी आरोपींचे पुर्ण नांव पत्ते निष्पन्न केले. सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर लागलीच फोन बंद करुन पळुन गेलेले होते. सदर आरोपींचे वास्तव्याची माहिती काढुन तोफखाना पो. ठाणे गु.र.नं. 619/2024 भादवि कलम 307 वगैरे या गुन्ह्यातील आरोपी नामे 1) अभिषेक उर्फ सोन्या राजेंद्र लांडगे वय – 22 वर्षे, , 2) संकेत किसनराव भिंगारदिवे वय 22 वर्षे, 3) जमीर शौकत पठाण वय 20 वर्षे, 4) ओमकार सतिष आपरे वय 21 वर्षे, सर्व रा. गांधीनगर, अहमदनगर, 5) परमेश्वर हरिभाऊ मगर वय 21 वर्षे, रा. बोल्हेगांव, ता. जि. अहमदनगर यांना तसेच तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 618/2024 भादवि कलम 324 वगैरे या गुन्ह्यातील आरोपी नामे 1) थॉमस उर्फ योगेश संतोष सरोदे वय 23 वर्षे, 2) यश रावसाहेब शिरसाठ वय 19 वर्षे, रा. गांधीनगर, मोरया पार्क, अहमदनगर, 3) एक विधीसंघर्षीत बालक यांना अहमदनगर शहरामधुन विविध ठिकाणावरुन ताब्यात घेवुन पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशनला हजर केले आहे. असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles