Wednesday, April 17, 2024

नगर जिल्ह्यात ग्रामसेवकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, ग्रामसेवक संघटना आक्रमक

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामसेवकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, ग्रामसेवक संघटना आक्रमक
अहमदनगर -नारायण घेरडे ग्रामविकास अधिकारी चापडगाव तालुका कर्जत यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे . याबाबत माहिती अशी चापडगाव ग्रामपंचायत बाजार तळावर इलेक्ट्रिक पोलवर फ्लेक्स बोर्ड झाकलेला नव्हता याबाबत ग्रामस्थांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सदर सोमवार दिनांक 1-4- 2024 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे
ग्रामसेवक संघटना आक्रमक
याबाबत स्थानिक संघटना आणि जिल्हा संघटना पदाधिकारी तालुका प्रशासनाबरोबर संघर्ष करीत आहेत गुन्हा मागे झाल्याशिवाय कामकाज करणार नाहीत अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश त्यांना जिल्हा संघटनेने दिलेली आहे याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलतो अशी चर्चा झाली आहे असे ग्रामसेवक नेते एकनाथ ढाकणे यांनी सांगितले
ही अन्यायकारक बाब असून यावर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे.गुन्हा मागे घेणे गरजेचे आहे.यामध्ये नारायण घेरडे यांची कोणतीही चूक नसताना जाणीवपूर्वक त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.हे असे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत.प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गुन्हा मागे घ्यावा व कर्मचाऱ्यांना वाजवी संधी द्यावी.गाव पातळीवर सर्व यंत्रणा बाजूला असताना ग्रामसेवक आचारसंहितेचे काम करत आहे आणि हे काम केल्यानंतर गाव पातळीवरील वादविवाद राजकारण समाजकारण या बाबीमुळे झाकलेले फ्लेक्स बोर्ड पुन्हा ओपन केले जात आहेत.याकडे डोळे झाक करता येणार नाही.याबाबत कुठेही यंत्रणा लक्ष ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा नाही आणि अशा बाबी फक्त ग्रामसेवकावर ढकलून प्रशासन काय साध्य करणार आहे.हे यामधून दिसून येत नाही.तरी तात्काळ गुन्हा माग घ्यावा अन्यथा जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सभासद बंधू भगिनी आचारसंहिता संबंधित कोणतेही काम निवडणूक विषय करणार नाहीत.असा स्पष्ट इशारा आणि निवेदन

अशोकराव नरसाळे जिल्हा सरचिटणीस,युवराज पाटील,श्याम भोसले, देविदास राऊत तालुकाध्यक्ष कर्जत तालुका,राहुल घोडके सचिव कर्जत,घायाळ भाऊसाहेब श्रीगोंदा,जामखेड अध्यक्ष एम पी शेख,सचिव सचिन गदादे,श्रीगोंदा संचालक संदीप लगड,तालुका अध्यक्ष तानाजी पानसरे श्रीगोंदा,सचिव नंदकिशोर होले,जिल्हा उपाध्यक्ष शितल पेरणे श्रीगोंदा , आसाराम कपिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles