गारपीठ ग्रस्त भागातील पशुधनांना जिल्हा बँके मार्फेत चारा उपलब्ध व्हावा
प्रशांत गायकवाड
पारनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीठ होऊन शेती पीक सह पशुधनासाठी आवश्यक असणार्या चार्याचे मोठे नुकसान झाले. मका, घास , मोरघास हे पशुधनासाठी महत्वाचे असणारे चारा पीके गारपीठांमुळे भुईसपाट झाले आहेत.पारनेर तालुक्यातील सिध्देश्वर वाडी , वादुले पानोली, सांगवी सुर्या , गांजीभोयरे ,पिपंळनेर, चिचोंली ,जवळा, निघोज अशा 24 गावातील 12 हजार शेतकर्याचा चारा पीकांचे नुकसान झाले आहे . तसेच जिल्ह्यातील नगर तालुका ,कर्जत, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले,पाथर्डी व इतर तालुक्यातील चारा पीक सह खरीब पीकेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकर्याचे पशुधन वाचविण्यासाठी यांना चारा जिल्हा बँके मार्फेत उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदन व्दारे राष्टवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.
जिल्हा बॅकेची संचालक मंडळाची सभेत मागणी करण्यात आली .त्यावेळी जिल्हा बँ केचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव कर्डीले व व्हा.चेअरमन मा. श्री.माधवराव कानवडे यांच्या सह संचालक मंडळांला निवेदन देत गारपीठ ग्रस्त भागातील शेतकर्याच्या पशुधनासाठी जिल्हा बॅकेने माणुसकीच्या भुमिकेतुन चारा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गारपीट….राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांची जिल्हा बँकेकडे बळीराजासाठी केली ही मागणी
- Advertisement -