Monday, July 22, 2024

अहमदनगर जिल्ह्यात ‘सैराट’ ! मुलीच्या नातेवाईकांनी केला मुलाचा खून

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय विवाहाला विरोध करत मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या पतीची निर्घृण हत्या केल्याचा
प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी काही आरोपींना अटकही करण्यात आली असून तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी: तालुक्यातील एका गावात एकमेकांच्या शेजारी राहात असलेल्या आंतरजातीय तरुण मुलाचे आणि शेजारील मुलीचे प्रेम होते. हे प्रेम आंतरजातीय असल्याने दोघांच्या कुटुंबीयांचा विरोध होणार, हे त्यांना माहित होते. मात्र, प्रेमाला जात नसते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लग्न केले आणि तेथे सुखी संसार करू लागले. पण मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नसल्याने त्यांना ते सतत खटकत होते.

शेवटी मुलीच्या कुटुंबीयांनी घरातील भांडण मिटवण्याच्या बहाण्याने मुलास बोलावून घेऊन त्याचा खून केला. इतकेच नव्हे तर, त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळूनही टाकला. आरोपींना अटक केल्याचे वृत्त समजले आहे. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे हकनाक तरुणाचा जीव गेला आहे.

समाज आज प्रगत झाल्याच्या गप्पा मारतो, प्रगतीचा आव आणतो, परंतु आजही समाजातील जातीय व्यवस्था संपलेली नाही हेच वास्तव असल्याचे या घटनेतून दिसते. या खून प्रकरणामुळे मुलीचा सुखी संसार मोडला आणि ज्यांनी हे कृत्य केले त्यांनाही अटक झाली. शेवटी, दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त होत आज उघड्यावर आल्याचे चित्र आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles