Monday, April 28, 2025

नगर जिल्ह्यात ‘या’ दोन गावांत चालवणार पती पत्नी गावगाडा,पती-पत्नी मिळून सरपंच-उपसरपंच!

अहमदनगर: महिला आरक्षणातून महिला सक्षमीकरणात क्रांतिकारी पाऊल पडले आहे. मात्र या निमित्ताने काही ठिकाणी पती-पत्नी मिळून संसारगाडा चालवणारे दांपत्याला आता गावगाडा एकत्रित चालवण्याचीही संधी मिळत आहे. असाच एक नव्हे तर दोन ग्रामपंचायतीत पती-पत्नी मिळून सरपंच-उपसरपंच झालेले दांपत्य गावचा कारभार एकहाती चालवणार आहेत. गंमत म्हणजे पती म्हणून घरी मुख्य कारभारी ग्रामपंचायतीत मात्र सरपंच पत्नीच्या सोबत दुय्यम भूमिकेत दिसणार आहेत

ग्रामपंचती सदस्यांसह लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडला. यात नगर जिल्ह्यातील 198 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा समावेश होता. या निवडणुका पार पडल्यानंतर सध्या उपसरपंच पदाच्या निवडणुका होत आहेत. बहुतांश ठिकाणी उपसरपंच पदाच्या निवडी या सहमतीने बिनविरोध होताना दिसत आहेत. यातून सामंजस्याचा संदेश दिला जात असताना नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता आणि निंबोडी या गावच्या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आलेले होते.

काल झालेल्या उपसरपंच पदाच्या वडगाव गुप्ता निंबोडी ग्रामपंचायतीचा कारभार पती-पत्नी मिळून पाहणार आहेत. नगर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुक पार पडल्या. निंबोंडी ग्रामपंचायत वगळता सात ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडी झाल्या.

काल झालेल्या निवडीत वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीची उपसरपंच पदी माजी सरपंच विजय शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या पत्नी विद्यमान लोकनियुक्त सरपंच सोनुबाई शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणुक निर्णय अधिकारी विक्रम पवार, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव अडसुरे यांनी निवडीचे काम पाहीले.
Untitled00 1

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles