Saturday, December 7, 2024

जिल्ह्यात पुरुष आमदारावर गदा येणार ! महिला आमदारांची संख्या वाढणार…

अहमदनगर-लोकसभेत मंगळवारी सादर करण्यात आलेल्या 128व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार, म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयकानुसार, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण सीमांकनानंतरच लागू केले जाईल. या विधेयकानंतर होणार्‍या जनगणनेच्या आधारेच हे सीमांकन केले जाईल.

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जनगणना आणि परिसीमन करणे जवळजवळ अशक्य आहे. यावरून विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेळेवर झाल्या तर यावेळी आरक्षणाची अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासून किंवा त्यापूर्वीच्या काही विधानसभा निवडणुकांपासून त्याची अंमलबजावणी होऊ शकते.

महाराष्ट्रातील आमदारांनी संख्या 288 इतकी आहे. महिला आरक्षणाचा कायदा झाल्यास राज्यातील 96 विधानसभेच्या जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. त्यामुळं राज्याच्या विधानसभेत तब्बल 96 महिला राखीव मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करतील. तर नगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा सदस्य आहेत. हे विधेयक मंजूर झाल्यास 12 पैकी 4 महिला सदस्य राहणार आहेत. त्यामुळे कोणत्या पुरूष आमदारावर गदा येणार हे अंमलबजवणीनंतरच पुढे येणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles