Sunday, September 15, 2024

खळबळजनक….अहमदनगर मधील कला केंद्रातील महिला कलावंतांचे शारीरिक शोषण…

कला केंद्रातील महिला कलावंतांचे आर्थिक व शारीरिक शोषण.

अहमदनगर (प्रतिनिधी) :- जामखेड येथील कला केंद्रातील महिला कलावंतांचे काही अप प्रवृत्ती कडून आर्थिक व शारीरिक शोषण होत असून त्यांच्या पासून संरक्षण मिळावे अशी मागणी जामखेड मधील विविध कला केंद्राच्या संचालिका, पार्टी मालकीनी व महिला नृत्य कलावंतानी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या कला केंद्राचे शिष्ट मंडळाने आज जिल्हाधिकारी सिद्धाराम सलिमाठ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले आहे. यावेळी महाराष्ट्र लोकनाट्य व सांस्कृतिक कला केंद्र मालक संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, मनसे जामखेड तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष आतिश पारवे, बंडू मुळे आदी यावेळी उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हटले आहे की, जामखेड मधील कला केंद्रामधील कुठल्याही हार्मोनियम वादक (पेटी मास्तर), ढोलकी वादक (वस्ताद) व सोंगाड्या यांना कामावरून टाकले नाही तर कोरोणा महामारी व लॉकडाऊन च्या संकटानंतर अनेक वादक व सोंगाड्या यांनी उपजीविकेचे साधन म्हणून पर्यायी छोटे मोठे उद्योग व्यवसाय व मोल मजुरी सुरू केली होती. कोरोना नंतर हळूहळू सर्वच क्षेत्रातील व्यवस्था हळू हळू पूर्व पदावर येत आहे.

जामखेड मधील कुठल्याही कला केंद्रावर पाय पेटी, ढोलकी, खंजिरी, टाळ या पारंपरिक वाद्या व्यतिरिक्त डिजे सिस्टीम किंवा होम थिएटर सिस्टीम वापरली जात नाही. तसेच कला केंद्र मालक व वादक यांच्या मध्ये दरवर्षी मानधना बाबतचा आर्थिक करार केला जातो तसेच मास्तर व वस्ताद यांना (वादक) यांना लाखो रुपये ॲडव्हान्स उचल दिली जाते. काही वादक एक पार्टी सोडून दुसऱ्या पार्टी कडे जातात. व त्यावेळी पार्टी मालकीण किंवा कला केंद्र मालक यांनी त्यांना दिलेली उचल परत मागितली असता भांडणे, मारामारी व शिवीगाळ करतात. व ॲडव्हान्स बुडवितात तसेच महिला कलावंतांचे आर्थिक व मानसिक शोषण करतात. तसेच कला केंद्र मालक व पार्टी मालकीण यांना वेठीस धरतात. असे असताना काही उप प्रवृत्तीने याबाबत प्रशासनाला चुकीची माहिती देऊन विपर्यास केला आहे. तर काही अपप्रवृत्ती कला केंद्र संचालिका, पार्टी मालकीनी व नृत्यांगना यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करीत आहेत. ज्या संघटनेने कलावंतांच्या नावाखाली तक्रार केली आहे किंवा आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या संघटनेने प्रत्येक कला केंद्रावर ढोलकी व पेटी वादक कलावंत उपलब्ध करून द्यावेत तसेच जिल्हा प्रशासनाने अशा संघटनांमधील कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा कला केंद्र क्षेत्रातील सर्व कलावंत रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने आंदोलन करतील असा इशारा जामखेड मधील कला केंद्र चालकांनी व कलावंतांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच तहसिलदार जामखेड व पोलीस निरीक्षक जामखेड यांनाही निवेदने देण्यात आली आहेत. तरी जिल्हाधिकारी यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ज्योती पवार (रेणुका कला केंद्र), संजीवनी जाधव (घुंगरू कला केंद्र), मंगल जाधव (नटराज कला केंद्र), राजश्री जाधव (स्वर राज कला केंद्र), मंदा चंदन (सप्तसूर कला केंद्र), लता जाधव (झंकार कला केंद्र), भामा बाई जाधव (जगदंबा कला केंद्र), अलका जाधव (अंबिका कला केंद्र) जामखेड यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles