केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळवलेल्या त्या अधिकाऱ्याच्या अपंग प्रमाणपत्राची खात्री व चौकशी व्हावी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी
गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अपंग प्रमाणपत्र घेऊन जेऊर बीट येथे केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळवलेल्या सदर अधिकाऱ्याने सादर केलेल्या कागदपत्रांची पुराव्याची खात्री व चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना दिले आहे. यावेळी संदीप वाघचौरे, कार्याध्यक्ष विकास पटेकर, विशाल भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
नुकेतच केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळवलेले अधिकारी जेऊरबिट येथे रुजू झाले आहेत. त्यांची पदोन्नती केव्हा झाली? कोणत्या संवर्गातून झाली, ज्या संवर्गातून झाली त्याबाबतची नोंद सेवा पुस्तकात घेतली आहे का? त्या संवर्गाचे अपंग प्रमाणपत्र कोणी दिले? हे प्रश्न रिपाईच्या वतीने उपस्थित करण्यात आले आहे. तर अपंग प्रमाणपत्र घेऊन पदोन्नती घेतल्याप्रकरणी सर्व कागदपत्राची खात्री करुन चौकशी व्हावी व त्यांची शारीरिक तपासणी होऊन खरे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
नगर जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुख पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची अपंग प्रमाणपत्राची चौकशी !
- Advertisement -