Monday, May 20, 2024

महिला अधिका-याने कर्मचाऱ्यांकडून घेतली 54 हजार रुपयांची लाच

धुळे जिल्ह्यात महिला बालकल्याण प्रकल्प महिला अधिकारी यांना प्रवास भत्त्याचे बिल मंजुर करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून 54 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने अटक केली. या घटनेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येथे खळबळ उडाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संबंधित महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांच्या विराेधात तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची शहनिशा झाल्यानंतर एसीबीने सापळला रचला.
या सापळ्यात शुभांगी बनसोडे या अलगद सापडल्या. बनसाेडे यांना कर्मचाऱ्यांकडून 54 हजार रुपयांची लाच घेणं चांगलेच महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला अधिकारी यांना अटक केली.

बनसाेडे यांनी तक्रारादार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावुन घेवुन प्रवास भत्ता मंजुर झालेल्या कर्मचा-यांचा प्रवासभत्ता काढुन दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडुन 10 टक्के प्रमाणे एकुण 93 हजार रुपयांची मागणी केली. पैसे जमा करुन आणुन देण्यास सांगुन पैसे दिले नाही तर पुढील प्रवासभत्त्याची बिले काढुन देणार नाही असेही सांगितले हाेते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles