Thursday, July 25, 2024

नगर तालुक्यातील मामा – भाच्याला जबर मारहाण, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर-मामा- भाच्याला पाच जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. घनशाम कोंडीबा म्हस्के (वय ५२ रा. निंबळक ता. नगर) व त्यांचा भाचा अतुल कोतकर अशी जखमींची नावे आहेत.जखमी घनशाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश भाऊसाहेब कोतकर, नितीन भाऊसाहेब कोतकर (दोघे रा. रेणुका माता मंदिराजवळ, एमआयडीसी), बाबासाहेब कारभारी राहटळ, संतोष भोसले (पूर्ण नाव नाही, रा. माताजीनगर, एमआयडीसी) व संदीप मारूती कळसे (रा. निंबळक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

६जून रोजी रात्री माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक येथे चोर आले म्हणून घनशाम म्हस्के व त्यांचा भाचा अतुल कोतकर हे साडेनऊ वाजता तेथे गेले. दरम्यान तुमचे
येथे काय काम आहे असे म्हणून अविनाश, नितीन, बाबासाहेब, संतोष व संदीप यांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी घनशाम यांनी १३ जून रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. अंमलदार साबीर शेख अधिक तपास करत आहेत

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles