१५ वाहने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा
दिनांक 21/11/2023 रोजी सायंकाळी कोतवाली पोलिसांनी अचानकपणे मा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ तसेच चाणक्य चौक बुरूडगाव रोड अहमदनगर या ठिकाणी नाकाबंदी केली. रोड वर विना क्रमांकाची वाहने, कोणतेही कागदपत्र जवळ न बाळगता प्रवास करणारे वाहने, फॅन्सी क्रमांकाचे वाहने, ट्रिपल सीट प्रवास करणारे दुचाकी वाहनांचे चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सदरच्या कारवाई मध्ये कोतवाली पोलिसांनी एकूण 15 दुचाकी वाहने ताब्यात घेतली असून त्यांच्या मालकांना कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. पोलीस स्टेशन आवारामध्ये मूळ मालकांकडुन त्यांच्या वाहनास नंबर प्लेट लावून घेणे सुरू आहे. त्यांच्यावर एकूण दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अश्या कारवाई यापुढे देखील चालू राहणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पोलीस जवान
विजय सोनवणे गणेश धौत्रे कैलास शिरसाठ देवा थोरात साबळे प्रमोद लहारे सतीश केकान हीनाबी बागवान यांनी केली आहे.