शेवगाव तालुका ग्रामसेवक संघटने तर्फे शासनाच्या निर्णयाचे स्वागत
प्रतिनिधी
संवर्गास आनंदाची बातमीने शेवगाव मध्ये जल्लोष
काल मुंबई येथे झालेल्या कॅबिनेट बैठकी मध्ये ग्रामसेवक संवर्गाचा अतिशय जिव्हाळ्याचा असलेला ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदे एकत्र करून एकच पद ग्रामपंचायत अधिकारी निर्माण झालेने काल शेवगाव येथे शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून अतिशय उत्स्फूर्तपणे जल्लोष साजरा करणेत आला.
यावेळी शेवगाव पंचायत समितीच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्यास माननीय विस्तार अधिकारी महादेव भोसले साहेब यांचे कडून पुष्पहार घालून पूजन करणेत आले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अशा घोषणा देऊन जल्लोष करणेत आला.
विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके सुजित भोंग साहेब,आणि महादेव भोसले साहेब यांचे हस्ते फटाक्यांची लड लाउन तोफांची सलामी देऊन आनंद साजरा करणेत आला.मोठ्या संख्येने ग्रामसेवक हजर होते.सर्वांच्या वतीने राज्याध्यक्ष संजीवजी निकम साहेब आणि सूचितजी घरत साहेब तसेच सर्वच राज्य पदाधिकारी हे तळ ठोकून मंत्रालयात बसून एक पदाचा प्रश्न मार्गी लावून आजच्या संघटनेच्या स्थापणेच्या दिवशी (२३-९-१९७० डी.एन.ई.१३६ स्थापना दिवस) माघारी फिरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी आभार मानले. यावेळी संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष सुभाषराव गर्जे सतीश सांगळे – तालुका अध्यक्ष सुनील काळे, सुरेश खरड ,दिलावर बागवान ,नानासाहेब जगताप ,सुरेंद्र जरांगे ,प्रफुल्ल राऊत ,मयूर देवढे
,रामनाथ तळेकर ,रामकिसन बटूळे,द्वारकानाथ आंधळे ,हरिभाऊ बोडखे ,देविदास पंडित ,चंद्रकांत देशमुख ,सोपान बर्डे ,महेंद्र डोंगरे,अंबिर तांबोळी ,विनोद ओतारि,पांडुरंग भगत ,दीपेश पिटेकर,रामेश्वर जाधव ,विट्ठल राजळे,अप्पासाहेब सुपेकर ,श्रीमती अर्चना कडू ,श्रीमती सविता बर्डे,श्रीमती आशा पाचारने ,श्रीमती शीतल साखरे,आसाराम कपिले -प्रसिद्धी प्रमुख आदि ग्रामसेवक पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने हजर होते.