शेअर मार्केटच्या नावाखाली २ कोटी ५६ लाख रुपयांचा गंडा घालणारे दोन आरोपी जेरबंद
पुणे येथुन केले जेरबंद, शेवगाव पोलिसांची कामगिरी
शेवगाव – शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली २ कोटी ५६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी सापळा लावुन पुणे येथुन केले जेरबंद प्रविण विक्रम बुधवंत राहणार शेवगाव यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी नामे भगवानबाबा व्हीके ट्रेड्रीग सोलुशन नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे ऑफीस लाडजळगाव तालुका शेवगाव येथे कंपनीच्या नावाखाली एकुण- २ कोटी ५६ लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- ६०८/२०२४ भादवि कलम –
४२०,४०९,४०६,३४ प्रमाणे दिनांक-२०/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे- १) ऋषिकेश ज्ञानेश्वर कोकाटे २) अमोल मोहन तहकिक दोन्ही रा. लाडजळगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर हे पुणे येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीस पथक तयार करुन पुणे येथे आरोपीना ताब्यात घेण्यासाठी पथक पाठविण्यात आले होते. तपास पथकाने पुणे येथे जावुन मांजरी हडपसर, पुणे येथुन दोन्ही आरोपी पोलीसांची चाहुल लागताच पळुन जात असताना दि०१ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चारचाकी वाहणाने पळून जात असताना पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. वरील आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोसई भास्कर गावंडे, पोहेकों / किशोर काळे, पोकों शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों/ संदिप म्हस्के पोकों / राहुल आठरे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकॉ राहुल गुड्डू यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोसई भास्कर गांवडे हे करत आहेत