Friday, February 23, 2024

वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी आ. संग्राम जगताप यांचे नाव, पत्रकार वागळे विरोधात पोलिसात तक्रार

नगर : राहुरी शहरातील आढाव वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरण घडले असून पोलीस प्रशासनाने या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने तपास करून जेरबंद केले आणि आरोपींनी देखील गुन्ह्याची कबुली दिली मात्र असे असताना देखील पत्रकार निखिल वागळे यांनी कोणतीही शहानिशा न करता नगर शहरातील काही राजकीय विघ्न संतोषी लोकांकडून मिळालेल्या चुकीची माहितीच्या आधारे युट्युब चॅनलद्वारे वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणी व्हिडीओ प्रसारित करत शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे या प्रकरणात नाव घेत त्यांची बदनामी केली त्यामुळे पत्रकार निखिल वागळे यांचा निषेध करत पोलीस अधिक्षकांकडे निवेदनातून तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तसेच लवकरच पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे असे मा, नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी सांगितले. यावेळी प्रा.माणिक विधाते, रेश्मा आठरे, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, अंजली आव्हाड, गजेंद्र भांडवलकर, मयूर बांगरे, मंगेश खताळ, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, सिद्धांत आढाव, समीर भिंगारदिवे, अमित खामकर, ऋषी ताठे, योगिता कुडिया, सुनीता गुगळे, प्रणव कदम, अयाज सय्यद, तौसिफ़ खान आदी उपस्थित होते,

राहुरी शहरातील आढाव वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणाचा तपास लागला असतानाही आ. संग्राम जगताप यांचे नाव घेऊन त्यांना या प्रकरणी बदनाम करण्याचे षडयंत्र शहरातील काही मंडळींकडून सुरु आहे, आ, जगताप यांनी विकास कामाच्या माध्यमातून व नागरिकांच्या सुखदुःखात सह्भागी होत राज्यात लोकप्रियता मिळवली, याचीच राजकीय लोकांना कावीळ झाली असून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र पत्रकार निखिल वागळे यांच्या माध्यमातून रचले हे कृत्य निंदनीय आहे, या व्हिडीओ क्लिपच्या पाठीमागे जे कोणी सूत्रधार असेल त्यांच्यावर कारवाई करावी, नगरची जनता सुज्ञ असून त्यांना खरे काय आणि खोटे काय हे माहित आहे, असे मत प्रा. माणिकराव विधाते यांनी व्यक्त केले

राहुरी शहरातील आढाव वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणाचे गांभीर्य पत्रकार निखिल वागळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून वळवण्याचे काम केले आहे, आ, संग्राम जगताप यांची वाढती लोकप्रियता व त्यांच्या कामाचा आवाका पाहता या गोष्टी पुरेपूर माहिती असताना शहरातील विघ्न संतोषी लोकांनी व स्वयंघोषित पुढाऱ्यांनी पत्रकार निखिल वागळे यांना चुकीची माहिती देत समाजात आ. संग्राम जगताप यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे, त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्यांना समाजासमोर आणावे आणि त्यांच्यावर तसेच पत्रकार निखिल वागळेवर कारवाई करावी यासाठी एसपींना निवेदन देण्यात आले असे वैभव ढाकणे यांनी सांगितले,

राहुरीतील आढाव वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून पत्रकार निखिल वागळे यांनी पोलिसांकडून सखोल माहिती घेऊन व्हिडीओ प्रसारित करणे गरजेचे होत मात्र कोणतीही माहिती न घेता खातरजमा न करता पत्रकार वागळे यांनी शहरातील विघ्नसंतोषी लोकांकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे व्हिडीओ प्रसारित केला, मात्र यामुळे शहराचे वातावरण दूषित करण्याचे काम हे विघ्नसंतोषी लोक करत आहे, तसेच हा व्हिडीओ करत तो व्हायरल करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे तरी त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करावी असे अजिंक्य बोरकर यांनी सांगितले.
यावेळी अंजली आव्हाड यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles