नगर: राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कु. संध्या सोनवणे यांचे कनिष्ठ बंधू उमेश उद्धव सोनवणे यांचे अल्पशा आजाराने 31 डिसेंबर रोजी निधन झाले याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांना माहिती दिली. त्यांची त्वरित दखल घेऊन अजित दादा पवार यांनी संध्या उद्धव सोनवणे यांना प्रत्यक्ष कॉल करून आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत राष्ट्रवादी काँग्रेस हा परिवार मानणारा पक्ष आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे दुःख हे पक्षाचे दुःख असतं संपूर्ण राष्ट्रवादी परिवार तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमच्या प्रत्येक आणि अडचणीला मदत करण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांना सांगितले आहे. मी देखील प्रत्यक्ष लवकरच तुमच्या भेटीला येईल.
प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी देखील संध्या सोनवणे यांच्याशी फोनवरून संपर्क करून आम्ही देखील तुमच्या दुःखात सहभागी आहोत मी माझा परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी आहोत
जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी देखील प्रत्यक्ष संध्या सोनवणे यांची भेट घेऊन मी माझा परिवार आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या दुःखात सहभागी आहोत .काहीही अडचण आली तर भाऊ या नात्याने सांगा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
यावेळी सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य कार्यकारणी सदस्य ज्योतीताई गोलेकर, कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कर्जत युवक अध्यक्ष संतोष धुमाळ, मजूर फेडेरेशन संचालक प्रकाश सदाफुले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रवादी युवतीच्या संध्या सोनवणे कुटुंबियांचे सांत्वन
- Advertisement -