अहमदनगर (दि.२७ प्रतिनिधी):-नगर शहरातील सावेडी उपनगर भागातील सपकाळ चौक येथे सख्या छोट्या भावानेच मोठया भावाचा खून केला असल्याची माहिती सामोर आली आहे.
मयत सोपान मूळे व आरोपी शुभम उर्फ
बांड्या मुळे यांच्या दोघात रात्री जोरदार भांडणं झाली आरोपी शुभम उर्फ बांड्या मुळे याने त्याच्या भावाचा डोक्यात धारदार शास्त्राने हल्ला केला यात सोपान मूळे जखमी झाला त्याला उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र सोपान मुळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टररानी सांगितले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.परंतु या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तोफखाना पोलिसांनी आरोपी शुभम उर्फ बांड्या मुळे ह्यास ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
अहमदनगर शहरात खळबळ ,सख्या भावानेच केला मोठ्या भावाचा खून…
- Advertisement -