Saturday, July 12, 2025

नगर शहरातील राधाकृष्ण मंदिरात चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी

श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा
भजन व भक्तीगीतांमध्ये भाविक रममाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. मंगळवारी (दि.27 ऑगस्ट) श्रीकृष्णच्या वेशभूषेत आलेल्या बालगोपालांनी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला. हदीहंडी फुटताच हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की! च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून निघाला. राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेत अवतरलेल्या चिमुकल्या मुला-मुलींनी सर्वांचे लक्ष वेधले.
सोमवारी (दि.26 ऑगस्ट) मध्यरात्री 12 वाजता मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पाळणा हलवून श्रीकृष्णची आरती करण्यात आली. सजवलेल्या पाळण्यात भगवान श्रीकृष्णची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी शहरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. युगल शरण महाराजांच्या मधुर वाणीत श्रीकृष्ण भजन व रासलीलेचा आनंद भाविकांनी लुटला. विविध भक्ती गीतांमधून श्रीकृष्ण लिलाचे वर्णन यावेळी करण्यात आले. राधे राधे…., मूड मूड के देखा मुखडा तेरा…, सर झुका हे, सर झुकेंगा आप के दरबार मे…, ओम जय जगदीश हरे… आदी एकाहून एक सरस भक्तीगीतांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. राधा-कृष्णवर भक्तीगीतांनी बहरलेल्या कार्यक्रमात भाविकांनी देखील ठेका धरला होता. भजनाने वातावरण भक्तीमय बनले होते. यावेळी शीख, पंजाबी समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंगळवारी गोपाळकालानिमित्त लहान मुलांसाठी श्रीकृष्ण-राधा यांची वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्या मुलांना श्रीकृष्ण-राधा बनवून पालकांनी आनले होते. या स्पर्धेतील सर्व सहभागी मुला-मुलींचा मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक सोहळ्यासाठी ट्रस्टचे सर्व विश्‍वस्त व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles