केडगाव : नगरकरांचे श्नध्दास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात आज ( गुरुवारी ) सकाळी उत्साहात घटस्थापना करण्यात आली .पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दि केली होती .नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे .
केडगावच्या रेणुकामंदिरात आज सकाळी ६ वाजता अभिषेक करण्यात आला . मंदिर परिसरातील मंगळाई देवी , भैरवनाथ मंदिर पुजन , परशुराम पुजन झाल्यानंतर केडगाव मधील सामाजिक कार्यकर्ते ओंकार सातपुते व धनश्री सातपुते यांच्या हस्ते विधीवत पुजा होऊन सपत्निक घटस्थापना करण्यात आली . यावेळी महाआरती करण्यात आली . देविला पारंपारिक आभुषणे परिधान करण्यात आली होती . मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . पुजारी दत्तात्रय गुरव ,शंकर गुरव , रविंद्र गुरव,गणेश गुरव, तुषार गुरव, शेखर गुरव , सुनील गुरव, रामभाऊ गुरव,शुभम गुरव आदिंनी पौराहित्य केले . यावेळी शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, अनिकेत शिर्के, यश सोनवणे, विठ्ठल महाराज कोतकर, अभय कारखिले , भाऊसाहेब विभुते,प्रज्वल राऊत,शक्शन कोतकर, प्रविण सातपुते, पालवे साहेब आदि उपस्थीत होते .
नवरात्रेत मंदिरात पहाटे व रात्री दोन वेळा आरती , ललित पंचमीला कुंकुम आर्चन , सातव्या माळेला फुलोराचा नैवेद्य , नवमीला होमहवण , दसऱ्याला शस्त्र पुजन आदि धार्मिक विधी होणार आहेत . पुरुष व महिला भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा तसेच मुखदर्शनाची सुविधा देवस्थान समितीने केली आहे .