धाराशिव जिल्ह्यातील 19 कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये 2 कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तसेच 12 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर 5 केंद्राना सक्त ताकीद देण्यात आली आहे.या कृषी सेवा केंद्राच्या तपासणी दरम्यान ई पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात समाविष्ट स्ञोताव्यतिरिक्त इतर निविष्ठांची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टरला नोंद नसणे आदी कारणामुळे कारवाई झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली.
यापुढे देखील तपासणी सुरूच राहणार आहे. दोषी विक्रेत्यांवर बियाणे/खते/किटकनाशके कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतकऱ्यांना ज्यादा दराने विक्री करणे,लिंकिग न करणे,साठा रजिस्टर अद्यावत न करणे आदी सुचनांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा कृषी विभागाने दिला इशारा