Tuesday, February 11, 2025

राम मंदिर उद्घाटन, विखे-कर्डिलेंचे नगर तालुक्यात साखर व दाळ वाटप

नगर : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गावच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना मंजूर करून आणल्या असून त्याचे काम सुरू आहे, नगर एमआयडीसी येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे पुढील एक वर्षांमध्ये सुमारे पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ५० वर्षाच्या काळामध्ये विखे परिवाराने नेहमीच जनतेच्या प्रश्नावर काम केले आहे आदर्श गाव मांजरसुंबा या गावांनी विकास कामातून कायापालट केला आहे, साखर वाटण्याची हिंमत आमच्यात आहे, आमची साखर ज्याला आवडत नाही त्यांनी ती घेऊ नये, आम्ही साखर वाटून मते मिळवणारे लोक नाहीत, आमचे जनतेची असलेल्या ऋणानुबंधातून चार किलो साखर व एक किलो डाळ वाटण्याचे काम सुरू आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
आदर्श गाव मांजरसुंबा येथे विविध विकास कामाचे उद्घाटन तसेच साखर व दाळवाटप कार्यक्रम संपन्न झाली, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी सरपंच मंगल कदम, उपसरपंच जालिंदर कदम, शंकर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विवेक नाईक, विजय शेवाळे, ताराचंद डोंगरे, जयराम कदम, भाऊसाहेब कदम, रूपाली कदम, प्रशांत कदम, चंद्रभान कदम, भागवत कदम, गोवर्धन कदम, पांडुरंग कदम आदी उपस्थित होते.
सरपंच मंगल कदम म्हणाल्या की, आदर्श गाव मांजरसुंबाला विविध विकास कामातून गावपण आले आहे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व माजी सरपंच जालिंदर कदम यांच्या नेतृत्वाखाली गावाने विकासाची झेप घेतली आहे गावामध्ये महिलांचे 25 बचत गट असून शेतकऱ्यांचे देखील बचत गट निर्माण केले आहे, चांगले काम उभे केले असल्यामुळे शासनाने आम्हाला विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे असे त्या म्हणाल्या.

22 जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे यानिमित्त चार किलो साखर व एक किलो डाळ वाटप करण्यात आले आहे तरी नागरिकांनी यापासून लाडू तयार करून आनंद उत्सव साजरा करावा असे मत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले

आदर्श गाव मांजरसुंबा येथे पर्यटन विकासासाठी निधी मंजूर – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

आदर्श गाव मांजरसुंबा हे नगर शहरापासून अवघे 15 किलोमीटरचे अंतर असून या ठिकाणी गोरक्षनाथ गड आहे भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात, त्यांच्यासाठी तसेच वन विभागाच्या जागेवर पर्यटन स्थळाची निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला असून सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले आहे, त्यामुळे मांजरसुंबा गावाला पर्यटनातून चालना मिळेल व ते एक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles