Saturday, October 5, 2024

नगर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ,खा. विखे पाटील स्पटचं म्हणाले…

अहमदनगर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ

या भागाचा खासदार म्हणून विकासाची जबाबदारी आपलीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील

अहमदनगरचा खासदार या नात्याने या भागाचा विकास करने ही जबाबदारी आपली असून पुढची पिढी घडविण्यासाठी येणाऱ्या काळात पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकास याला प्राधान्य देणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. अहमदनगर तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व विक्रम पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्याचे सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने मागील एक वर्षा पासून सर्व योजनांचा लाभ आता नागरिकांना मिळत आहे, मागील आघाडी सरकारच्या काळात काही दिल्याशिवाय काही मिळत नव्हतं मात्र आमच्या महायुतीचे सरकार आल्यावर सरकार तुमच्या दारात येत आहे. आघाडी सरकारच्या तीन वर्षाच्या कारभाराने आपले राज्य पाच-दहा वर्षे मागे गेले, मात्र आता राज्यात आलेले सर्वसामान्यांचे हे महायुतीचे सरकार दिवसरात्र एक करून आपल्या भल्यासाठी विकास योजना राबवित आहे. एवढेच नाही तर केंद्रातील मोदी सरकार हे कायम वंचित, पीडित, दिव्यांग बंधू भगिनी साठी मागील नऊ वर्षांपासून अविरत काम करत आहे.
निस्वार्थ भावनेने काम केले, कधी कोणा कडून ही कशाची अपेक्षा केली नाही. सर्वसामान्य जनतेला केंद्र स्थानी ठेवून खासदारकीचे काम केले आहे. हे काम करत असताना आपल्या पुढच्या पिढीला सन्मानाने जगता येईल असे काम करून ठेवायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला मात्र दिव्यांगा‌च्या कल्याणासाठी एवढा विचार करून त्यांना आनंदाने जगता यावे याकरिता थेट योजना आखली आणि ती यशस्वीपणे राबविली देखील.

विरोधकांच्या टीकेला कामातून त्यांनी उत्तर दिले आहे. आणि याच पाऊल वाटेवर आपणही त्यांचा आदर्श घेवून मागील साडेचार वर्ष काम करत आहोत. लोकांशी संपर्क ठेवण्या पेक्षा विकास कामातून तो लोकांना अनुभवता यावा यासाठी काम करतो असे सांगितले.
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, या बरोबरच स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे काम प्राधान्याने करावयाचे आहे यात काही कामे हे होत आले असून लवकरच उर्वरित कामे हे पूर्णत्वास नेवू असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.

काही व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची सवय असून
व्यक्तिगत स्वार्थाचा विचार करून समाज संपन्यासाठी ते काम करत आहेत. आपण सर्व सुज्ञ आहात त्यामुळे अशा व्यक्ती पासून आपण सर्वांनी सावध राहावे असे आवाहन खा.विखे यांनी केले.

आजच्या कार्यक्रमात 50 कोटी रुपयांची घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३४४ लक्ष रुपयांच्या वाळकी ते वाळुंज रस्ता डांबरीकरण तसेच ग्रामपंचायत कार्यालय इमारत ४२ लक्ष रुपये यासह मौजे खडकी आगडगाव, डोंगरगण व शिंगवे नाईक ता. नगर येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शिंगवे नाईक ते वांबोरी रस्ता डांबरीकरण,खडकी ते सारोळा कासार रस्ता दुरुस्ती काम,आगडगाव येथील भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण काम तसेच वनविभागाच्या डोगरगण येथील जैवविविधता उद्यानाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी विक्रम पाचपुते, शिवाजीराव कर्डिले यांची भाषणे झाली.
या सर्वविकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles