Wednesday, February 28, 2024

वृध्दाच्या डोक्यात दगड घालुन निघृणपणे खुन करणारे 2 आरोपी जेरबंद, नगर जिल्ह्यातील घटना

चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर येथील वृध्दाच्या डोक्यात दगड घालुन निघृणपणे खुन करणारे 2 सराईत आरोपी 24 तासाचे आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. बाळु देवराम खेमनर वय 42, रा. हनुमान मंदीरा जवळ, चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर यांचे वडील मयत देवराम मुक्ता खेमनर हे मलिबाबा मंदीर, चिंचेवाडी येथे झोपलेले असताना यांचे डोक्यात दगड घालुन कोणीतरी अनोळखी इसमाने जिवे ठार मारले बाबत घारगांव पो.स्टे.गु.र.नं. 12/24 भादविक 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर ना उघड खुनाचे गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 19/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/अतुल लोटके, दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड व चासफौ/चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने लागलीच घटना ठिकाणी आजु बाजूस राहणारे लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे नामदेव सोन्नर व सुरेश कोकरे दोन्ही रा. साकुर, ता. संगमनेर यांनी खुन केला असुन ते चिंचेवाडी डोंगरामध्ये लपुन बसलेले आहेत, आता गेल्यास मिळुन येतील अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथकाने तात्काळ चिंचेवाडी परिसरातील डोंगरात जावुन बातमीतील संशयीतांचा शोध घेत असतांना 2 इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) नामदेव रंगनाथ सोन्नर वय 25, रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर व 2) सुरेश बाबुराव कोकरे वय 25, रा. कोकरेवस्ती, चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी मयत नामे देवराम खेमनर हे दि.17/01/24 रोजी मलिबाबा मंदीर, चिंचेवाडी येथे झोपलेले असताना दारु पिण्यासाठी त्यांचे खिशातील पैसे काढुन, त्यांचे डोक्यात दगड टाकुन खुन केल्याचे सांगितले.

ताब्यातील आरोपींकडे सखोल व बारकाईने तपास करता आरोपी नामे नामदेव रंगनाथ सोन्नर हा घारगांव पो.स्टे.गु.र.नं. 549/2023 भादविक 379, 34 या गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ताब्यातील दोन्ही आरोपींना घारगांव पोलीस स्टेशन गु.र.नं.12/2024 भादविक 302 या गुन्ह्याचे तपासकामी घारगांव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास घारगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles