नगर जिल्ह्यातील लोणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले आहे. यात घराजवळील शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणी परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी (१४ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली, अथर्व प्रवीण लहामगे (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. अथर्व हा घराजवळच खेळत होता, यावेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. घराजवळील शेतात मुलावर बिबट्याचा हल्ला केला होता. मुलगा सापडत नसल्याने त्याचा शोध घेतला. दरम्यान रात्री दहा वाजता मुलाचा मृतदेह सापडला. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अनेक दिवसापासून बिबट्याचा परीसरात मुक्त संचार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वन विभागाला माहिती देत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र वन विभागाच्या हलगर्जीपणा मुलाच्या जिवावर बेतला आहे. वेळीच बिबट्याला जेरबंद केले असते तर घटना टळली असती. या घटनेनंतर नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे.