Wednesday, April 17, 2024

अहमदनगर मधील घटना अनैतिक संबंधातून पतीचा खून, प्रियकरासह तिघांना अटक,असा केला खून…

अहमदनगर-संगमनेर खुर्द तालुक्यातील निमगाव पाणा या नदीच्या पट्ट्यातील आणि सधन गावात कोरोना काळात लॅब उभी केली. महामारीच्या वेळी माया जमवली.मूळची घारगाव बोटा परिसरातील रहिवासी असलेली ती महिला लॅब टाकून निमगावात राहत असताना तिला तिचा मित्र भेटला आणि त्याच्यासोबत
अनैतिक संबंध असल्याचा तिच्या पतीला संशय आल्याने पत्नीने तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचा काटा काढला. विशेष म्हणजे त्याचा एक कोटींचा विमा उतरविल्याची माहिती असताना पैशांसाठी तिने पतीला संपवले. याप्रकरणी आळंदी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीसह तिघांना अटक करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंबळी येथे झालेल्या हत्येत राहुल सुदाम गाडेकर (वय ३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या पथकाने पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर, भारतीय सैन्य दलातील तिचा प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे तसेच त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तीन जणांना अटक केली आहे. मृत राहुल गाडेकर याची पत्नी
सुप्रिया गाडेकर हिने संगमनेर तालुक्यातील निमगावपागा गावात कोरोना काळात लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असताना तिचे भारतीय सैन्य दलातील सुरेश मोटाभाऊ पाटोळे याच्याशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले, याची माहिती पती राहुल गाडेकर याला झाल्याने दोघा नवराबायकोमध्ये सातत्याने भांडणे होत होती. त्यामुळे सुप्रिया हिने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा खून करण्याचा कट रचला होता. राहुल गाडेकर यांनी स्वताचा एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढल्याची माहिती पत्नी सुप्रिया आणि तिच्या प्रियकराला होती. राहुल गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मिळणाऱ्या
सुप्रिया विम्याच्या रकमेतील अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांना देणार होती.
असा केला होता खून….
राहुल गाडेकर हा चाकण येथील कंपनीत कामावर जात असताना पाठीमागून आलेल्या सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याची हत्या केली होती.त्यानंतर आरोपी सुरेश पाटोळे हा त्याच्या नोकरीसाठी हैदराबाद येथील सैन्य दलाच्या प्रशिक्षण केंद्रात रुजू झाला होता. तर रोहिदास घाडगे हा संगमनेर येथील त्याच्या घारगाव बोटा गावी निघून आला. परंतु पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles