Tuesday, June 25, 2024

२१ वर्षीय विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, नगर तालुक्यातील घटना….

अहमदनगर :-अज्ञात कारणातून २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील देहरे गावच्या शिवारात असलेल्या ठाणगे वस्ती येथे सोमवारी (दि.२७) पहाटे उघडकीस आली. साक्षी अमोल ठाणगे (वय २१, रा. ठाणगे वस्ती, देहरे, ता.नगर) असे या मयत विवाहितेचे नाव आहे.

साक्षी हिचा ३ वर्षापूर्वी अमोल ठाणगे याच्याशी विवाह झालेला होता. तिने अज्ञात कारणातून सोमवारी (दि.२७) पहाटे कधीतरी राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला ही बाबत तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यावर तिला बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. वने यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.मयत साक्षी हिचे पश्चात पती, सासू, सासरे असा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles