Monday, March 4, 2024

नगर शहरात लग्न मोडण्याची धमकी देऊन युवतीचा विनयभंग, नगर तालुक्यातील युवकावर गून्हा दाखल

लग्न मोडण्याची धमकी देऊन युवतीचा विनयभंग
युवकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल 
अहमदनगर शहरातील एका युवतीला लग्न मोडण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची घटना चितळे रोड  परिसरात घडली. या घटनेप्रकरणी सदर युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दीपक चौरे विरुद्ध  विनयभंग व इतर कलमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोफखाना पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
समजलेली माहिती अशी,तोफखाना परिसरात राहणारी युवती ही एका हॉस्पिटलमध्ये  डाटा ऍन्ट्री ऑपरेटर म्हणुन नोकरी करत होती, त्यावेळी तेथे तिची  दिपक गणेश चौरे (रा-शेंडी पोखर्डी)  याचेसोबत ओळख झाली होती. तो  हॉस्पिटल  येथे लॅब टेक्निशियन म्हणुन नोकरीस होता.  हस्पीटल  येथे डयुटी वर असताना दिपक चौरे याचे सोबत  ओळख झाल्याने  मैत्री देखील झाली होती. ड्युटी वर असताना आमचे एकमेकांशी बोलणे तसेच दुपारचे जेवण आम्ही एकत्र करत असायचे. मी डयुटीवर असताना मित्र मैत्रीणी सोबत फोटो काढले होते. सप्टेंबर महिन्यात  लग्न जमले होते. त्यामुळे मी दिपक चौरे याला तु माझेशी जवळ येवु नकोस, बोलत जावु नकोस माझे लग्न जमलेले आहे असे सांगितले होते. परंतु त्याला मी समजावुन सांगुन देखील तो मला म्हणायचा की, माझे तुझ्यावर प्रेम आहे तु माझेशी लग्न कर असे म्हणुन माझेशी बळजबरीने  बोलायचं प्रयत्न करत होता . तु माझी नाही झाली तर मी तुझे कोठेही  लग्न होवु देणार नाही अशी धमकी दिली होती.  लग्नाची तारीख जवळ आल्याने  हस्पीटल  येथील काम सोडले होते. दिपक चौरे याने माझा होणारा नवरा  यास माझे व तीचे एक वर्षापासुन प्रेम आहे. तु कशाला आमच्यामध्ये पडतो तु तिचेशी लग्न करु नकोस असे मेसेज केले होते. दि. 27 रोजी  दिल्लीगेट शनीमंदिर येथुन दर्शन करुन चौपाटी कारंजा येथे दत्त मंदीराजवळुन जात असताना मला पाठीमागुन कोणीतरी मला आवाज देउन माझा हात धरून विनयभंग केला तसेच माझे लग्न जमले होते त्यांना मोबाईल करून धमकी देऊन लग्न मोडले आहे असे फिर्यादित म्हटले आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles