Friday, February 23, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील घटना… मामाकडे आलेल्या भाचीचा खून…

अहमदनगर-मामाकडे आलेल्या भाचीवर नात्यातील मुलानेच चाकूने भोसकून तिचा खून केल्याची घटना राक्षसवाडी बुद्रुक (ता. कर्जत) येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली.
श्रावणी मोहन पाटोळे (वय १७, रा. म्हसेवाडी ता. करमाळा, हल्ली रा. बेकराईनगर, हडपसर, पुणे) असे मृत मुलीचे नाव आहे. दरम्यान, मुलीवर वार केल्यानंतर मुलानेही विषारी औषध सेवन करून स्वत:ला चाकूने भोसकून घेतले. यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने नगरला हलवण्यात आले आहे.
प्रतीक लक्ष्मण काळे (वय २२ वर्षे, राक्षसवाडी बुद्रुक) असे या मुलाचे नाव आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत कर्जत ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
श्रावणी मोहन पाटोळे ही मुलगी काही दिवसांपूर्वी राक्षसवाडी बुद्रुक (ता. कर्जत) येथील आपला मामा सचिन महादेव काळे यांच्याकडे आली होती. दरम्यान, मंगळवारी (१६ जानेवारी) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास
नात्यातीलच प्रतीक लक्ष्मण काळे हा श्रावणीकडे गेला. नंतर काही वेळातच त्याने चाकूने तिच्यावर वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने श्रावणीचा मृत्यू झाला. नंतर विषारी औषध सेवन करून प्रतीकने त्याच चाकूने स्वत:लादेखील भोसकून घेतले.
त्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला असून, त्यास तातडीने उपचारासाठी नगरला हलबिण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles