भरदिवसा घर फोडून रोकड व दागिने लंपास
नगर कल्याण रोडवरील घटना ; घरफोडीचा गुन्हा दाखल
नगर – किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून भरदिवसा घरातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा १९ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नगर-कल्याण रस्त्यावरील गणेशनगर येथील रायगड हाईटसमध्ये बुधवारी (दि. १०) सकाळी ११ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी गुरूवारी (दि. ११) तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. सागर चंद्रकांत डहाळे (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. डहाळे पती-पत्नी मजुरी काम करतात. ते दोघे बुधवारी सकाळी ११ वाजता घर बंद करून कामावर गेले होते. रात्री १० वाजता कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी घराचा मेन दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता त्यांना किचनचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी पाहणी केली असता घरातील कपाटाचे लॉक तुटलेले दिसले. त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व १२ हजारांची रोकड दिसून आली नाही. चोरट्यांनी एकूण १९ हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
भरदिवसा घर फोडून रोकड व दागिने लंपास,नगर कल्याण रोडवरील घटना
- Advertisement -