नगर तालुक्यातील मोठ्या गावां पैफी असलेल्या चिचोंडी पाटील मध्ये शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत सरपंच शरद पवार आणि भारतीय जन संसद जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य सुधीर भद्रे यांच्यात झालेल्या वादा चे पडसाद काल रविवार दि 10 डिसेंबर रोजी रात्री पुन्हा उमटले . यावेळी दोन्ही गटात झालेल्या झटापटीत आणि हाणामारीचे वाद अखेर मध्यरात्री पोलीस ठाण्या पर्यत पोहचले. दोन्ही गटा नी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या . ग्रामसभेतील वादा नंतर पोलिस आल्या नंतर त्यावेळी दोन्ही गटांनी आपली काही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले होते .
पण तात्पुरत्या मिटलेल्या वादाला रविवारी रात्री 8 वाजता पुन्हा दोन्ही गटात शाब्दीक चकमक होत हाणामारी होऊन एकदूसऱ्याला लायाबुक्यांनी मारल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या . पवार गटा चे किरण मोरे यांनी तर भद्रे गटाचे सतीष कोकाटे यांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत . किरण मोरे यानी तक्रारित म्हटले आहे की मी रविवारी रात्री ग्रामपंचायत शेजारील आंबेश्वर मेंडिकल मध्ये औषधे आणण्यासाठी गेलो असता तेथे सतीष आबा कोकाटे याने येऊन ग्राम सभेत वाद का मिटवला म्हणुन तोडांवर झापड मारून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . त्याच वेळी आंबादास नाना कोकाटे पळत येऊन त्याने ही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . तसेच माझ्या विरुद्ध तक्रार केल्यास तुझ्या विरुद्ध व शरद पवार विरोधात खोटे गुन्हे दाखल करू व तुम्हाला संपवुन टाकु अशी धमकी देऊन निघुन गेले .
तर सतीष आबा कोकाटे याने फिर्यादीत म्हटले आहे की रविवारी रात्री आठ वाजता आंबेश्वर मेडिकल सुमोरून घरी जात असताना किरण मोरे याने ग्रामसभेतील वादावरून शिवीगाळ करून माझ्या तोडांवर झापड मारुन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . तसेच माझ्या विरुद्ध तक्रार केल्यास तुझ्या विरुद्ध व सुधीर भद्रे विरोधात खोटे गुन्हे दाखल करू व तुम्हाला संपवुन टाकु अशी धमकी दिली .
ग्रामसभेच्या वादा नंतर दोन गट भिडले, नगर जिल्ह्यातील घटना…
- Advertisement -