Wednesday, April 17, 2024

शिंदे सरकारचं पोलीस पाटलांना मोठं गिफ्ट,पोलीस पाटलांच्या पगारात भरीव वाढ

राज्यभरातील पोलीस पाटलांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. पोलीस पाटलांना आतापर्यंत 6500 रुपये पगार प्रतिमहिना मिळत होता. हाच पगार आता 15000 रुपयांवर करण्यात आला आहे. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील. सध्या पोलीस पाटलांना ६५०० रुपये मिळतात. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या पोलीस पाटलांची ३८ हजार ७२५ पदे असून मानधनात वाढ केल्यास ३९४ कोटी ९९ लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल. या खर्चासही मान्यता देण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles