Sunday, July 21, 2024

आमचं आता ठरलंय ! आमचा स्वाभिमान आमचे विमान भाजप नेते हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार?

“आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा”, अशा आशयाचे बॅनर इंदापुरात झळकले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हर्षवर्धन पाटील दोन वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आहेत. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही इंदापुरातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणार आहेत. त्यामुळे विधानसभेला इंदापूरची जागा कोणाला सुटणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं.

सध्या आम्ही महायुतीमध्य आहोत. महाविकास आघाडीमध्ये आम्ही होतो, तेव्हा अजित पवार यांनी तीन वेळेस शब्द दिला. मात्र, त्यांनी शब्द पाळला नाही, असं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. शिवाय, तुम्ही विधानसभेला आमचं काम केलं तरच लोकसभेला मदत करु, असा इशाराही अंकिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिला होता. तर काहीही झालं तरी आम्ही इंदापूरची विधानसभा लढवणारच असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी केलं होतं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles