इंदापुरातील राष्ट्रवादी आणि भाजप संघर्ष शिगेला पोहचला आहे. स्थानिक पातळीवर मित्र पक्षाचेच लोक चुकीची भाषा वापरत जाहीरपणे धमकावत असल्याचा आरोप भाजपाचे इंदापूरचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की,
मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे.
सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती.