Saturday, February 15, 2025

तरच बारामतीत लोकसभेला मदत करणार….भाजपचा अजित पवारांना जाहीर इशारा…

इंदापूरचे माजी आमदार आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तथा पुणे भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी अजित पवार यांना निवडणुकीपूर्वी इशारा दिला आहे. अंकिता पाटील म्हणाल्या, आम्ही पूर्वी आघाडीत होतो आणि आता महायुतीत एकत्र आहोत. मागच्या तिन्ही वेळेस अजित पवार यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आमचे जे उमेदवार जाहीर (इंदापूरमध्ये) होतील त्या उमेदवारासाठी ते आमची मदत करणार असतील, विधानसभेला ते आमची मदत करणार असतील तरच आम्ही लोकसभेला त्यांचं काम करू.

२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्ता भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. हर्षवर्धन पाटलांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी इंदापुरात मेहनत घेतली होती.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचे पूत्र राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार आणि जिंकणार असा शड्डू ठोकला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles