Tuesday, June 25, 2024

इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी केला हल्ला

देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोर नंबर प्लेट नसलेल्या चार चाकी गाडीमध्ये आले. तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संविधान चौकामध्ये त्यांच्यावर हा हल्ला झाला. पाटील यांच्या गाडीचे चालक मंखरे यांचा डोळ्यात मिरचीची पूड टाकली, लोखंडी गजाने हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यातून श्रीकांत पाटील हे बचावले, त्यांना गंभीर काही इजा झाली नाही. मात्र यावरून आता सत्ताधारी पक्षांना विरोधकांनी निशाण्यावर धरलं आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1793932142403326078?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1793932142403326078%7Ctwgr%5Ee1992f1ba85dba4e20af7699a82abce348b7d933%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fpune%2Findapur-tehsildar-attack-case-mla-rohit-pawar-has-demanded-the-resignation-of-deputy-chief-minister-and-home-minister-devendra-fadnavis-latest-marathi-news-1204687.html

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles