Tuesday, June 25, 2024

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार, विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व बुधवारी स्वीकारले. यासाठीचे पत्र त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले.

माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासोबत खासदार पाटील आजच मुंबईला रवाना झाले होते. मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची भेट ते घेणार होते. मात्र मुंबईत अधिक वेळ न दवडता आमदार कदम यांनी खासदार पाटील यांना घेऊन थेट दिल्ली गाठली. दिल्लीत खरगे यांची भेट घेऊन कॉंग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले.

सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुने खर्गे यांना भेटून दिले पाठिंब्याचे पत्र. काँग्रेस खासदारांची संख्या आता १००.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles