नागपूर : भारतीय जनता पक्षातील क्रमांक दोनचे नेते अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. दळणवळण आणि रस्ते विकास मंत्रालय सांभाळणाऱ्या गडकारींना काहीजण ‘रोडकरी’ सुद्धा म्हणतात मात्र त्यांनी हे रोड, रास्ते नेमके कुठे केले हेच नागपूर शहरात फिरताना दिसत आणहीत. मात्र गडकरी लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करताना करत असलेला वारेमाप खर्च दिसतोय, निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या बांधनाचे उल्लंघन गडकरी यांच्याकडून होत असून नितीन गडकरी यांनी मर्यादेत राहून खर्च करावा अशी मागणी इंडिया अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले, 2014 साली देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोडी यांची निवड करताना अमित शहा यांनी तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि संघाचे संजय जोशी यांना दूर ठेवले होते, कारण गडकरी या पडायचे प्रबळ दावेदार होते. गडकरी यांनी मागील 10 वर्षात नागपूरचा कोणताही विकास केला नाही, आज निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दाखवायला विकास कामे नाहीत यामुळे त्यांच्याकडून प्रसिद्धी आणि अन्य बाबींसाठी मोठ्या प्रमानार पैश्यांची उधळपट्टी सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. मात्र गडकरी या मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे दिसते, गडकरी यांनी खर्चाला यांवर न घातल्यास त्यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. नागपुरात आमचे कार्यकर्ते त्यांच्या खर्चावर बारीक नजर ठेऊन असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.