विरोधी पक्षाचे इंडिया आघाडीच्या २८ पक्षांची बैठक दिल्ली येथे पार पडली. बैठकीच्या आधीच पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करा, आघाडीच्या समन्वयपदी नितीशकुमार यांचे नाव घोषित करा, अशा मागण्या होत होत्या. मात्र, ऐन बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड करण्याची मागणी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील हीच मागणी लावून धरली.
या मागणी नंतर स्वतः मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार होण्यास स्पष्ट नकार दिला. आधी इंडिया आघाडीचे खासदार निवडून आणू मग उमेदवार ठरवू, असे खर्गे म्हणाले. पहिल्यांदा जिंकणे महत्वाचे आहे. जिंकलो नाही तर पंतप्रधान पदाची चर्चा करून काय उपयोग? असे देखील खर्गे म्हटले.