Saturday, March 2, 2024

लोकसभा निवडणूक, सोनिया गांधी तेलंगणातून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून उतरणार

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वड्रा राज्यसभेवर जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. या दोन्ही नेत्या राज्यसभा नव्हे, तर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे नेते, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ही माहिती दिली.

सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यास प्रियांका गांधी रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात हे जवळपास निश्चित होणार आहे. तसे झाल्यास प्रियांका यांचे निवडणुकीच्या राजकारणातील हे पहिले पाऊल ठरेल. पण सोनिया या लोकसभा लढणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. सोनिया गांधी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles