Monday, July 22, 2024

Post Office Bharti : दहावी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये भरती प्रक्रिया सुरू

भारतीय पोस्ट विभागात सामान्य श्रेणीतील रिक्त पदांसाठी भरती आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. भारत सरकार, संचार मंत्रालय आणि पोस्ट ऑफिसद्वारे या नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भारतीय डाक विभाग आणि प्रशासन विभागाद्वारे ही जाहिरात देण्यात आली आहे. केंद्र सरकारअंतर्गत ही भरती केली जात आहे. १० वी पास उमेदवारांसाठी या भरतीसाठी पात्र आहेत. त्यामुळे दहावी पास तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ या पदासाठी ही नोकरी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. किमान ३ वर्ष कार चालवण्याचा अनुभव असायला हवा.२ रिक्त पदांसाठी नोकरी उपलब्ध आहे. नवी दिल्ली येथे ही नोकरी करावी लागणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, अनुभव, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स ऑफलाइन पद्धतीने पाठवावेत. श्री विनायक मिश्रा, सहाय्यक महासंचालक, पोस्ट विभाग, डाक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-११०००१ या पत्त्यावर ही माहिती पाठवावी. २३ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles