Wednesday, April 30, 2025

देशभरात २४ तासांत आढळले ६५६ करोनाबाधित रुग्ण, सक्रीय रुग्णसंख्या ३७४२, महाराष्ट्रातही ..

देशात करोनाबाधित रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी देशभरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती. त्यामुळे भारताने सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु, आता पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला करोनाचा नवीन उपप्रकार जेएन.१ ने बाधित रुग्ण आढळत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दररोज शेकडो नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोव्हिड-१९ चे ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या देशात ३,७४२ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १२८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळमध्ये तीन हजार सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. तर कर्नाटकमध्ये २७१ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये ९६ नवे रुग्ण सापडले आहेत. या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह राज्यात सध्याच्या घडीला १०३ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
संपूर्ण भारतात शुक्रवारी (२२ डिसेंबर) ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले होते. एकट्या केरळमध्ये २६५ करोनाबाधित रुग्ण सापडले होते. तसेच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यापाठोपाठ शनिवारीदेखील देशभरात शेकडो नवे रुग्ण आढळले. देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles