भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर हा त्याच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहे. 2011 वर्ल्ड कप फायनलबद्दल गौतम गंभीरने पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या या सामन्यात एमएस धोनीने नाबाद 91 रनची खेळी केली होती, ज्यामुळे भारताने 275 रनचं आव्हान यशस्वी पार केलं, त्यामुळे धोनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. गंभीरने मात्र मॅन ऑफ द मॅचवर दुसऱ्याच खेळाडूचा अधिकार होता, असं गंभीर म्हणाला आहे.
2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरने 97 रनची महत्त्वाची खेळी केली होती, पण झहीर खान मॅन ऑफ द मॅचसाठी खरा लायक होता, असं वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे.
2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झहीर खानने 10 ओव्हरमध्ये 60 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. झहीर खानने फायनलच्या पहिल्या तीनही ओव्हर मेडन टाकल्या होत्या, यानंतर मॅचच्या 7व्या ओव्हरमध्ये त्याने उपुल थरंगाची विकेट घेतली होती. पहिल्या 5 ओव्हरच्या स्पेलमध्ये झहीरने फक्त 6 रन दिल्या होत्या.