इंडियन आयडल’ या टिव्ही रियालिटी शो चे १५ वे पर्व सध्या सुरू आहे. या शोमध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी येतात. या वीकेंडला नाना पाटेकर या शोमध्ये हजेरी लावतील. या शोचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात ते स्पर्धक मिस्मी बोसू (Myscmme Bosu) हिच्याशी बोलताना दिसत आहेत.
प्रोमोमध्ये, नाना पाटेकर मिस्मीला विचारतात, “तुझा अंकशास्त्रावर विश्वास आहे?” तिने हो म्हटल्यावर हा शो कोण जिंकणार? असं नाना यांनी तिला विचारलं. हा प्रश्न ऐकताच मिस्मी गप्प होते, ती काहीच बोलत नाही. मग नाना तिला त्यांचं वय किती ते सांगायला विचारतात, यावेळी मिस्मी शोचा होस्ट आदित्य नारायणकडे बघताना दिसते.
नाना हसत हसत म्हणतात, “तुझे हे अंकशास्त्र बकवास आहे. तू चांगलं गा, हेच सत्य आहे, बाकीचं सगळं सोडून दे.” नाना असं स्पष्ट बोलल्यामुळे मिस्मी व परीक्षकांच्या चेहऱ्याचे भावही बदलले होते. ‘नाना म्हणाले – गाण्यावर जर पूर्ण लक्ष असेल तर बाकी कशाची गरज नाही!’, असं कॅप्शन देऊन सोनी लिव्हच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.https://www.instagram.com/reel/DC9X-UAO0w0/?utm_source=ig_web_copy_link