भारतीय रेल्वेच्या खानपान सेवेबाबत अनेकदा तक्रारी येत असतात.आता रेल्वेत चहा तयार करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे पद्धतीने चहा तयार केला जातो.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या डब्यामध्ये चहा तयार करत आहेत. किटलीमध्ये दूध गरम केलं जातंय. अन् आश्चर्याची बाब म्हणजे हे दूध चक्क वॉटर बॉयलरच्या मदतीनं गरम केलं जातंय. दरम्यान या कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला पाहिलं आणि त्यानं लगेचच तो व्हिडीओ बंद केला. त्यामुळे पुढे काय घडलं हे सांगता येत नाही. पण वॉटर बॉयलरच्या मदतीनं गरम केलं जाणारं दूध पाहून काही नेटकरी खवळले आहेत.