Monday, April 28, 2025

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा! वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. संगमनेर न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना जामीन मंजूर मंजूर केला आहे. त्यांच्या विरोधात PCPNDT कायद्यानुसार दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर यांच्या जामीन अर्जावर 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र आज सुनावणीच्या एक दिवस आधीच त्यांनी स्वतः न्यायालयात हजर राहत जामीन घेतला आहे. 24 तारखेला इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्याने त्यांनी या अर्जावर आज सुनावणी करण्यासाठी विनंती केली होती न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत इंदुरीकर यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे, इंदुरीकर यांचे वकील अॅड. के. डी. धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी २०२० मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर जुलै २०२० मध्ये PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने इंदुरीकरांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून इंदुरीकर महाराजांविरोधात खालच्या कोर्टात खटला चालवण्याचा आदेश दिला.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी इंदुरीकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यानंतर आता इंदुरीकर महाराजांवर दाखल प्रकरणाची संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles